विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा प्रामाणिकपणे अभ्यास करावा: लता जाधव महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची माहिती घेऊन पुढे जमेल तसा अभ्यास करून स्पर्धा परीक्षा पास होऊन समाजात मानाची व आर्थिक स्थिरतेची गणिते योग्य जमवावी व स्वतःला सिद्ध करावे. असे मत राजाराम कॉलेजच्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रा. डॉ.सौ.लता जाधव. संचालिका प्रि.आय.ए.एस ट्रेनिंग सेंटर, व भौतिकशास्त्र विभाग प्रमुख राजाराम कॉलेज कोल्हापूर, यांनी व्यक्त केले. यावेळी त्यापुढे म्हणाल्या, की आजच्या काळात नोकरीच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा प्रामाणिकपणे अभ्यास करावा व चांगल्या पगाराची नोकरी मिळवावी, तुम्ही कोणत्याही जातीचे धर्माचे किंवा कोणत्याही परिस्थितीचे असला तरी स्पर्धा परीक्षा तुम्हाला नक्कीच मार्ग दाखविते. तुमचे आयुष्य बदलून जाते असे यावेळी त्या म्हणाल्या,यावेळी व्यासपीठावर प्रा. डॉ.गंगावणे महाविद्यालयाचे न्यक समन्वयक डॉ .खानापुरे, ग्रंथपाल श्री.अतुल नगरकर, उपस्थित होते, कार्यक्रम...